Employment fraud case | नोकरीच्या आमिषाने 27 युवकांची 1 कोटी 43 लाखांची फसवणूक

दोघांना अटक, दहा दिवसांची पोलिस कोठडी
Employment fraud case
Employment fraud case | नोकरीच्या आमिषाने 27 युवकांची 1 कोटी 43 लाखांची फसवणूकFile Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर : रेल्वे, आयकर विभाग व भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तब्बल 27 युवकांची एक कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंडित ऊर्फ अखिलेश कुमार (रा. उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल) व गौरव मिश्रा ऊर्फ रुद्रप्रताप नरेंद्रकुमार मिश्रा (42, रा. गंगोत्री विहार, लखनौ, उत्तर प्रदेश) या दोघांना पोलिसांनी अटक केली. चार वर्षांपासून फरार असलेल्या संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 10 दिवस पोलिस कोठडी सुनावली.

लखनौ व पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने रचलेल्या सापळ्यातून संशयित संशयित मिश्रा व कुमार यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्रात आणण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील, हवालदार अनिल चव्हाण व ज्ञानेश्वर सानप यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

या प्रकरणी डिसेंबर 2022 मध्ये आनंदा गणपती करडे (रा. कुरुंदवाड) यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार क्रांतिकुमार पाटील (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), मोहम्मद कामील अब्दुल गफार, अनिस खान गुलाम रसूलखान (रा. नागपूर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (रा. कोलकाता) व सुबोधकुमार, पंडित ऊर्फ अखिलेश कुमार (रा. मध्याग्राम, दक्षिण 24 परगणा, कोलकाता) यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी मोहम्मद कामील अब्दुल गफार (41, सध्या रा. कुर्ला, मुंबई. मूळ नागपूर) याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून उर्वरित संशयितांचा शोध घेतला जात आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news