कोल्हापूर : कृष्णेचा पूर ओसरला; आठवड्यानंतर नृसिंहवाडीतील दत्त मंदिर खुले | पुढारी

कोल्हापूर : कृष्णेचा पूर ओसरला; आठवड्यानंतर नृसिंहवाडीतील दत्त मंदिर खुले

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : तब्बल एक आठवड्यानंतर कृष्णा नदीला आलेला पूर ओसरला. भाविक व नागरिकांच्या दर्शनासाठी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर आज (दि.२०) खुले झाले आहे. कृष्णा, पंचगंगा नदीला आलेला पुरामुळे  मंदिर १३ जुलै रोजी पाण्यात गेले होते. आज आठव्या दिवशी नद्यांना आलेला पूर ओसरल्यामुळे महापुराचे संकट तूर्त तरी टळले आहे.

आज दुपारी बारा वाजता होणारी महापूजा मंदिरातील दत्त प्रभूंच्या चरण कमलावर संपन्न झाली. त्यानंतर असंख्य भाविक, नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला. येथील पालखी सोहळा बंद झाला असून, इंदू कोटी स्तोत्राचे पठण व कृष्णा नदीची आरती करण्यात आली. रात्री शेजारती झाली. दरम्यान, पुरामुळे मंदिराच्या दक्षिणोत्तर निर्माण झालेला गाळ काढण्याचे काम आज येथे सुरू होते. कृष्णा नदीच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन भाविकांनी कृष्णा नदीत स्नान करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button