Private Moneylender | खासगी सावकारांकडून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

करवीर पोलिसांची कारवाई; साडेआठ तोळे दागिने, सहा लाखांची रक्कम गोठवली
करवीर पोलिसांनी जप्त केलेली मोटार.
करवीर पोलिसांनी जप्त केलेली मोटार. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : व्यवसायासाठी खासगी सावकारांकडून घेतलेल्या सहा लाखांच्या बदल्यात अडीच कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी सावकार सिद्धेश गायकवाड, अजिंक्य जाधव यांच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ करण्यात आली. त्यांच्याकडून करवीर पोलिसांनी साडेआठ तोळे दागिने, संशयितांच्या बँक खात्यावरील सहा लाखांची रकमेसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

गीता स्वप्नील मोरे (३२, रा. चिंतामणी पार्क, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) यांच्याकडून सहा लाखांच्या रकमेसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी अजिंक्य संभाजी जाधव (२५) आणि स्वाती सुनील सिन्नूर (२३, सर्व रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांना अटक केली आहे. पोलिसांनी सिद्धेशकडून साडेआठ तोळ्याचे दागिने, व्याजाच्या पैशातून घेतलेली चारचाकी जप्त केली आहे. तसेच अन्य सात आरोपींची बँक खाती गोठवून त्यातील रक्कमही गोठवल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

हडपलेले दागिने नातेवाईकांच्या नावावर

सिद्धेश गायकवाड याने गीता मोरे यांचे सोनाराकडून दागिने परस्पर सोडवून घेतले. हे दागिने नातेवाईकांच्या नावावर अन्य बँकेत गहाणवट ठेवल्याचे आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news