

कोल्हापूर : कोल्हापूरच्या समृद्ध खाद्य संस्कृतीत एक नवा मानदंड प्रस्थापित करणारा क्षण नुकताच अनुभवायला मिळाला. 24K क्राफ्ट ब्रूझ आणि सत्त्व प्युअर व्हेज यांच्या नव्या भव्य उपक्रमाचा शुभारंभ रिजेंट टॉवर, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे दिमाखदार वातावरणात झाला. 24K क्राफ्ट ब्रूझच्या यशस्वी दहा वर्षांच्या प्रवासानंतर साकारलेला हा प्रकल्प शहराच्या खाद्यविश्वाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
या भव्य शुभारंभ सोहळ्यास शहरातील मान्यवर, उद्योगपती, व्यावसायिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच खाद्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमास खासदार धैर्यशील संभाजीराव माने आणि विश्वविजय दिग्विजय खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमात विशेष रंग भरला.
नव्या प्रकल्पामध्ये उत्कृष्ट खाद्य अनुभव आणि आधुनिक सुविधांचा संगम साधण्यात आला आहे. येथे स्वतंत्र शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट 'सत्त्व प्युअर व्हेज', समर्पित व्हेज किचन, प्रशस्त बँक्वेट स्पेस, इनडोअर व आऊटडोअर आसनव्यवस्थेसह प्रीमियम लाऊंज, सिग्नेचर ब्रूज, राजेशाही खाद्यपदार्थ आणि शहराचे विहंगम स्कायलाईन दृश्य अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. कुटुंबीय, मित्रमंडळी, कॉर्पोरेट गट आणि विविध समारंभांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
या प्रसंगी 24K क्राफ्ट ब्रूझचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक राजेश करंदीकर, ऑपरेशन्स संचालक सूरज लिगाडे, तसेच भागीदार संदीप सोनवलकर आणि मोहन पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मचारी, सहकारी, भागीदार आणि हितचिंतकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
रिबन कटिंग, सत्कार समारंभ, प्रेरणादायी मनोगत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य भोजन सोहळ्याने सजलेल्या या कार्यक्रमाचा समारोप मनमोहक 'सुफी नाईटस्' संगीत मैफलीने झाला. 24K क्राफ्ट ब्रूझ आणि सत्त्व प्युअर व्हेजचा हा शुभारंभ केवळ एका नव्या उपक्रमाची सुरुवात नसून, कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीला लाभलेली एक अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण भर ठरली आहे. हा प्रकल्प शहराला जागतिक दर्जाचा खाद्य आणि मनोरंजन अनुभव देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.