राजर्षी शाहूंकडून शिक्षण, वसतिगृह चळवळीला बळ | पुढारी

राजर्षी शाहूंकडून शिक्षण, वसतिगृह चळवळीला बळ

कोल्हापूर : डॉ. अरुण भोसले : बहुजनांचे समाजातील प्रभुत्व वाढविण्यासाठी राजर्षी शाहूंनी शिक्षण आणि वसतिगृह चळवळीला बळ देऊन शिक्षणाची नवीन कवाडे खुली केली, असे प्रतिपादन लेखक डॉ. अरुण शिंदे यांनी केले. शाहू जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित ‘राजर्षी शाहू व बाह्मणेत्तर चळवळ’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अरुण भोसले होते.

डॉ. शिंदे म्हणाले, शाहू महाराज यांनी दक्षिण भारतात प्रवास करून बाह्मणेत्तर चळवळीला बळ दिले. त्यांनी तयार केलेला जाहीरनामा बहुजनांसाठी नव्या युगाचा प्रारंभ ठरला. शाहू महाराज यांच्या कार्यातून जबाबदारीचे भान व्यक्‍त होत होते. लोकांच्या समस्या समजण्यासाठी लोकांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. त्यामुळे लोकजीवनात शाहू महाराज समरस झाले. कोणतेही कार्य करताना ते त्याबाबतचा सुस्पष्ट आराखडा तयार करत.

वेदोक्‍त प्रकरणाने त्यांना बदलून टाकले. बहुजन समाजाचे प्रभुत्व वाढविण्यासाठी त्यांनी दक्षिण भारतात प्रवास करून ब—ाह्मणेत्तर चळवळीला बळ दिले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक डॉ. अशोक चौसाळकर, ट्रस्टचे सचिव दत्तात्रय कवितके, उपस्थित होते. पंडित कंदले यांनी प्रास्ताविक केले. राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.

Back to top button