हुपरीत जुगारअड्ड्यावर छापा; 55 जणांना अटक | पुढारी

हुपरीत जुगारअड्ड्यावर छापा; 55 जणांना अटक

हुपरी : पुढारी वृत्तसेवा येथील हुपरी-यळगूड रस्त्यावर रेंदाळ हद्दीत रविवारी दुपारी जुगार अड्ड्यावर कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून 55 जणांना अटक केली. यावेळी 46 हजार 980 रुपये रोख रकमेसह 6 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 16 मोटारसायकल व 27 मोबाईलचा समावेश असून जुगार अड्डाचालक व घरमालक फरार आहेत. या छाप्याबाबत गुप्तता पळण्यात आली होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करून 55 जणांना अटक केली. युसूफ बागवान (रा. मानेनगर, रेंदाळ) व प्रकाश संताजी पाटील (रा. हुपरी) हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेल्यांची नावे अशी : रवींद्र कांबळे, जोतिराम नरके, विजय रामचंद्र पाटील, रावसाहेब वसंत पाटील, राजू रामचंद्र विभुते, रामा लाटे, राजरत्न भागोजी मुधाळे, महादेव शिवा लायकर, अजित सदाशिव बिचकर, मानसिंग यशवंत पाटील, मंगेश सुदाम कांबळे, शौकत दस्तगीर मुजावर, शाहरूख मैनुद्दीन मुजावर, प्रताप विलास मेथे, संभवनाथ भूपाल भेंडवाडे, सुरेश दत्तू पाटील, सुभाष राजाराम ससे (सर्व रा. हुपरी), प्रकाश पांडुरंग साळोखे, प्रदीप निवृत्ती आवटी, बाळू सदाशिव खोत, दिलावर चांद फरीद, राजू महादेव खोत, अशोक शंकर कागले, सुभाष शामराव धुळे (सर्व रा. यळगूड), राजेंद्र नामदेव वायदंडे (रा. कुन्नूर), शिवकुमार बसवेश्वर चिखले, रंगराव मारुती सावंत, रसूल आप्पालाल मुजावर, राजेंद्र धोंडिबा माळी, सतपाल नाईकवा हारगे, रणजित राजाराम चिखले, अशपाक आयुब बिसूरे, रामचंद्र जालिंदर कुंभार, मोदीन महंमद पठाण, सूरज अल्लाबक्ष नायकवडी, अमोल दादू गरड, (सर्व रा. रेंदाळ), बसगोंडा रामगोंडा पारवते (रा. सुळकूड), बजरंग आप्पासाहेब कुंभार, प्रदीपकुमार भूपाल घुगे (दोघे भोज), साहेबलाल मुदीन मुजावर (अब्दुललाट), अरुण प्रभाकर कांबळे (इंगळी), शिवाजी वसंत लोखंडे (तळंदगे), कुमार देवगोंडा पाटील (शिरदवाड), रणजित आनंदा बिराजे (पट्टणकोडोली), अरुण विलास कोणे, काशिनाथ बसाप्पा चव्हाण (दोघे बारवाड), मारुती नागाप्प्पा बिळगे (मांगूर), शिरीषकुमार आपासो कांबळे, प्रवीणकुमार श्रीकांत भोसले, सचिन रामचंद्र दिंडे (तिघे कारदगा), सूरज चंदुलाल नागदेव (गांधीनगर), विनोद दादासो शितोळे, मारुती बसवंत धर्मूचे (दोघे रा. तळंदगे), अभिजित रावसो तराळ, सागर गुंडू ढेकणे (दोघे मांगूर). ही कारवाई गुन्हा अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, एस. बी. कुंभार, महादेव कुराडे, किरण भोगण, सचिन देसाई आदींच्या पथकाने केली.

Back to top button