कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार सव्वादोन वर्षांनी खुले

जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार सव्वादोन वर्षांनी खुले
जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार सव्वादोन वर्षांनी खुले
Published on
Updated on

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे बंद ठेवलेले जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार सुमारे सव्वादोन वर्षांनंतर पुन्हा कायमस्वरूपी खुले करण्यात आले आहे. सोमवारपासून या प्रवेशद्वारातून ये-जा सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दोन द्वार आहेत. यापैकी नागाळा पार्कच्या बाजूला 'इन' तर महावीर उद्यानाच्या बाजूला 'आऊट' गेट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दि.23 मार्च 2020 पासून 'इन' गेट बंद करण्यात आले होते. 'आऊट'गेटमधूनच ये-जा सुरू होते. मध्यंतरी काही वेळ अधूनमधून 'इन' गेट उघडले जात होते.

मात्र, सुमारे सव्वा दोन वर्षानंतर प्रथमच हे गेट खुले करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत म्हणजे जुन्या काळातील कृषी संग्रहालय होते. या इमारतीचा मूळ ढाचा कायम ठेवून, त्याला साजेशी इमारत 2015 मध्ये साकारण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काँक्रीटीकरण करण्यात आले असून त्याअतर्गंत प्रथमच दोन्ही प्रवेशद्वारांना कमानी करण्यात येणार असून त्यावर प्रथमच फलकही लावला जाणार आहे. यापैकी 'इन' गेटच्या कमानीचे काम पूर्ण झाले असून सध्या 'आऊट' गेटचे काम सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news