Kolhapur Loan Waiver | कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २३,३१६ शेतकर्‍यांना कर्जमाफी

पहिल्‍या टप्‍प्‍यातील यादी सर्व १,०३१ गावांत प्रसिद्ध
Kolhapur Loan Waiver |
Kolhapur Loan Waiver | कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २३,३१६ शेतकर्‍यांना कर्जमाफी
Published on
Updated on

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील २३ हजार ३१६ शेतकरी पहिल्‍या टप्‍प्‍यातील यादीत कर्जमाफीसाठी पात्र ठरले. १,०३१ गावांतील ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सोसायट्या, बँका, तलाठी कार्यालये, दूध संस्‍था येथे पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर कर्जमुक्‍ती योजनेतील पात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी (दि. २५) प्रसिद्ध झाली. आधार प्रमाणीकरण सुरू झाले असून कर्जमाफीची रक्‍कम लवकरच बँक खात्‍यात जमा होणार आहे.

राज्‍य सरकारने कर्जमुक्‍ती योजनेची घोषणा केली. प्रत्‍येक जिल्‍ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती मागविली. त्‍यानुसार कोल्‍हापूर जिल्‍ह्यातून २९ हजार ४२९ शेतकर्‍यांची माहिती शासनाच्‍या पोर्टलवर अपलोड केली. शनिवारी गावागावांत पात्र लाभार्थ्‍यांची यादी प्रसिद्ध झाली.

६ हजार शेतकरी ‘वेटिंग’वर

६,११३ शेतकरी अद्यापही ‘वेटिंग’वर आहेत. यापैकी किती शेतकरी पात्र ठरणार, हे पुढील यादी प्रसिद्ध झाल्‍यावर स्‍पष्‍ट होणार आहे. कर्जमाफीच्‍या रकमेची माहिती एकत्रित करण्‍याचे काम सुरू असून जिल्‍ह्यात किती कर्जमाफी मिळाली याची रक्‍कम सोमवारी (दि. २७) समजेल, असे जिल्‍हा बँकेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी सांगितले.

तालुकानिहाय पात्र शेतकरी

आजरा १,०२०, भुदरगड १,३९१, चंदगड २,५०६, गगनबावडा १,१०४, गडहिंग्‍लज १,५७९, हातकणंगले १,२८२, कागल १,२३३, करवीर पूर्व १,५१०, करवीर पश्‍चिम २,८७३, पन्‍हाळा २,२१२, राधानगरी २,५७७, शाहूवाडी २,९३२, शिरोळ १,०९७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news