मान्सून केरळमध्ये तीन दिवस आधीच दाखल | पुढारी

मान्सून केरळमध्ये तीन दिवस आधीच दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सून केरळ मध्ये कधी येईल याची गेल्या पंधरा दिवसांपासून चातकासारखी वाट पाहिली जात होती. अखेर आज रविवारी २९ मे रोजी नियोजित वेळेपेक्षा ३ दिवस आधीच मान्सुन केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रात ५ जून पर्यन्त येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदाचा उन्हाळा अतिशय कठीण जात आहे. मार्चमध्ये तापमान ४३ अंशापर्यंत गेले. एप्रिल मध्ये बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४५ अंशावर गेले. मेमध्ये ही प्रचंड उन्हाळ्याच्या झळा सहन कराव्या लागल्या तसेच अवकाळी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले. महाराष्ट्रात सरासरी उणे 69 टक्के इतका कमी अवकाळी पाऊस या कालावधीत झाला. 16 मे रोजी  मान्सून अंदमानात दाखल झाल्याने  27 मे पर्यंत केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. पण मान्सूनचा प्रवास मंदावल्याने त्याचा अंदाज येत नव्हता. अखेर केरळमध्ये आज 29 मे रोजी सकाळी दाखल झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडून मान्सूनचे वारे तळ कोकणाच्या दिशेने लवकरच वेगाने सुरू होऊन ५ जून पर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे ही वाचलंत का? 

Back to top button