kolhapur | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला 20 वर्षे कारावास

असहाय्यतेचा फायदा घेत तीन वर्षे बलात्कार
Minor girl assault case |
Minor girl assault case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला 20 वर्षे कारावास
Published on
Updated on

कोल्हापूर : दहावीत शिक्षण घेणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तीन वर्षे लैंगिक अत्याचार करणार्‍या कात्यायणी (ता. करवीर) येथील दत्तात्रय बंडू गोरे (वय 53) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांनी शुक्रवारी दोषी ठरविले. आरोपीला 20 वर्षांचा कारावास, 3 हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला.

2019 ते दि. 27 जून 2023 या काळात हा प्रकार घडला. अत्याचाराला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन नराधमाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची फिर्याद दाखल केली होती. चौकशीअंती या गुन्ह्याचा तपास राधानगरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. राधानगरी पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गोरे याला बेड्या ठोकून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकारी पक्षामार्फत सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. प्रतिभा जयकर जाधव यांनी काम पाहिले. खटल्यात 14 साक्षीदार तपासण्यात आले. अ‍ॅड. जाधव यांनी केलेला युक्तिवाद, वरिष्ठ न्यायालयातील न्याय निवाडे, प्रत्यक्ष दाखल पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गोरे याला भारतीय दंडविधान संहिता कलम 376(अ), 504, 506 तसेच पोक्सो कलम 4,6, 12 नुसार 20 वर्षे कारावास, तीन हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news