Construction Permission Fraud | बनावट सही, शिक्क्याचा वापर; मोरेवाडीतील २० जणांवर गुन्हा

मंडल अधिकाऱ्यांचा कारवाईचा बडगा
Construction Permission Fraud |
Construction Permission Fraud | बनावट सही, शिक्क्याचा वापर; मोरेवाडीतील २० जणांवर गुन्हाFile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गुंठेवारी एस.आर.सह बांधकाम परवाना आदेशावर करवीर तहसीलदार यांच्या बनावट सही, शिक्क्याचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मोरेवाडी (ता. करवीर) येथील २० जणांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोकुळ शिरगावचे मंडल अधिकारी रामदास महादेव लांब (वय ५०, रा. उजळाईवाडी) यांनी फिर्याद दाखल केल्याने मोरेवाडीसह परिसरात खळबळ उडाली आहे.

दि. १४ जानेवारी २०१४ ते दि. १७ जानेवारी २०१४ दरम्यान गुंठेवारी एस. आर.च्या आदेशावर करवीर तहसीलदार यांची बनावट सही आणि शिक्क्यानिशी आदेश तयार करून स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर केल्याप्रकरणी मंडल अधिकारी लांब यांनी अजय रामचंद्र म्हेतर (रा. सिद्धी विनायक प्राईड, कारंडे मळा, कोल्हापूर) याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात मंडल अधिकारी लांब यांनी तरन्नूम शब्बीर मोमीन, शाफीन शब्बीर मोमीन यांच्यासह मोरेवाडी येथील १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये जाफर फिरोज बागवान यांच्यासह इतर दोघे, बबन दत्तात्रय इंगवले, दशरथ, दत्तात्रय इंगवले, संजय आनंदराव पाटील, प्रकाश मारुती मोरे, राजू सिकंदर महालकरी, रासिक महमंद मलबारी, निकिता नीलेश मिसाळ, उदय राजाराम पाटील, प्रकाश पांडुरंग माने, पुंडलिक चंद्राप्पा पाटील, महादेव ज्ञानू बुगडे, अजय रामचंद्र म्हेतर, (रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांचा समावेश आहे.

२०१३ ते २०२२ दरम्यान मुदतीत बांधकाम परवाना आदेशावर करवीर तहसीलदार यांच्या बनावट सही, शिक्क्याचा वापर करून स्वत:च्या फायद्यासाठी संशयितांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news