Ambabai Temple | तीन दिवसांत दोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

सलग सुट्टी, नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची गर्दी
कोल्हापूर : अंबाबाई दर्शनासाठी रविवारी झालेली भाविकांची गर्दी.
कोल्हापूर : अंबाबाई दर्शनासाठी रविवारी झालेली भाविकांची गर्दी. (छाया : नाज ट्रेनर)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गांधी जयंतीची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. २ ते ४ ऑक्टोबर या तीन दिवसांत तब्बल २ लाख ११ हजार ६७९ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.

२ ऑक्टोबर रोजी ८१ हजार ५२४ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी ६९ हजार १२८, तर ४ ऑक्टोबर रोजी ६१ हजार २७ भाविकांनी दर्शन घेतले. सलग सुट्टीमुळे परगावाहून कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली होती. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू होती. दर्शनासाठी रांगा लागल्याने मंदिर परिसरात दिवसभर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले.

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरातही उत्साहाचे वातावरण आहे. सलग सुट्टीचा योग साधत अनेक भाविकांनी कुटुंबीयांसह कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. दर्शनाबरोबरच भाविकांनी शहरातील विविध धार्मिक व पर्यटनस्थळांनाही भेटी दिल्या.

तीन दिवसांतील भाविक संख्या

२ ऑक्टोबर : ८१,५२४

३ ऑक्टोबर : ६९,१२८

४ ऑक्टोबर : ६१,०२७

एकूण : २,११,६७९ भाविक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news