पिस्तुलचा धाक दाखवून चंदगड तालुक्यात साडेतीन लाख लुटले | पुढारी

पिस्तुलचा धाक दाखवून चंदगड तालुक्यात साडेतीन लाख लुटले

चंदगड : पुढारी वृत्तसेवा

बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावरील कोरज फाटा येथे पिस्तुलचा धाक दाखवून चार अज्ञातानी तब्बल साडेतीन लाख लुटल्या प्रकार घडला. यामुळे चंदगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तात्काळ पोलिसांनी नाकाबंदी करूनही लुटारूंचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले.

नागणवाडी फाट्यावरील दत्तगुरू पेट्रोप पंपावरील कामगार जनार्दन जाणबा कुंदेकर रा. बेळेभाट ( ता. चंदगड ) व गणपत सतबा आवडण ( रा. बगीलगे ) हे दोघेजण एकाच दुचाकीवरून रात्री १० वाजण्याच्या सुमारास जात होते. दरम्यान, कोरज फाट्यावर दबा धरून बसलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी दुचाकी अडवली.

त्यानंतर त्यांनी पैशाची मागणी केली. यावेळी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी पिस्तुल डोक्याला लावत पिस्तुलचा धाक दाखवला. यावेळी आवडण यांनी दुचाकीच्या डिक्कीत असलेले साडेतीन लाख रुपये दिले. याचवेळी लुटारूंनी आवडण यांचा मोबाईल हिसकावून घेतला बेळगावच्या दिशेने पलायन केले.

चोरटे मागावर होते

नागणवाडी पेट्रोल पंप परिसर रात्री आठ नंतर निर्मनुष्य असतो. हीच संधी साधून चोरट्यांनी कोरज फाटा निवडला आणि काम फत्ते केले. दुचाकीवरून आलेल्या चौघांनीही डोक्यावर हेल्मेट आणि अंगात जॅकेट तसेच रेनकोट घातले होते. त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून लुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : आईचे तुकडे करणारा कसा पोहोचला फाशीपर्यंत?

Back to top button