Panchganga river bridge | पंचगंगा नदीवरील पिलर पुलासाठी 1,913 कोटी मंजूर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ट्विटद्वारे माहिती
Nitin Gadkari
Panchganga river bridge | पंचगंगा नदीवरील पिलर पुलासाठी 1,913 कोटी मंजूर(File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल-सातारा या अंतरातील पंचगंगा नदीवर उभारण्यात येणार्‍या पिलर पुलाच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ट्विटद्वारे दिली आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल-सातारा रोडवर सांगली फाटा ते पंचगंगा पूल या सध्या अस्तित्वातील पुलामुळे पूरस्थिती निर्माण होते. याबाबत दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधून पिलर पुलाची मागणी केली आहे. या मागणीस गडकरी यांनी मंजुरी दिली.

पंचगंगा नदीवर सांगली फाटा ते उचगाव रेल्वे बि—ज या 3.578 किमी लांबीच्या सहा पदरी पिलर उड्डाणपुलास (एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या (उड्डाणपूल) बांधकामास 1 हजार 913 कोटी 70 लाख रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाखाली सहा पदरी सिमेंटचा सर्व्हिस रोड व गांधीनगर जंक्शनचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूस (महामार्ग ओलांडण्यासाठी) दोन अंडरपास मंजूर करण्यात आले आहेत.

दिल्ली ते चेन्नईला जोडणारा राष्ट्रीय महामागु पुणे-बंगळूर या महामार्गामुळे मुंबई, पुणे आणि बंगळूर यांसारख्या प्रमुख महानगरांशी थेट संपर्क प्रस्थापित करतो. पंचगंगा नदीलगतचा भाग सखल असल्याने येथे वारंवार पूरस्थिती निर्माण होते. या प्रकल्पामुळे भविष्यात वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news