कोल्हापूरच्या बिल्डरचा ऐवज सांगलीत लंपास | पुढारी

कोल्हापूरच्या बिल्डरचा ऐवज सांगलीत लंपास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विजयनगर येथील एका हॉटेलच्या दारात पार्किंग केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्याने 14 लाख 81 हजार किमतीचे 37 तोळे दागिने असलेली पर्स लंपास केली. मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकरणी सिद्धेश विजय माने (रा. बी वॉर्ड, ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) यांनी विश्रामबाग (सांगली) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माने हे बांधकाम व्यावसायिक आहेत. नातेवाईकाच्या लग्नासाठी माने दाम्पत्य सांगलीला गेलेे होते. रात्री ते विजयनगरला जेवणासाठी आले. त्यावेळी दागिन्यांची पर्स कारमध्ये सीटवर ठेवून त्यांनी दरवाजा लॉक केला होता. चोरट्याने कारच्या दरवाजाची काच फोडून आतील पर्स लांबविली. त्यामध्ये दहा तोळ्यांचे गंठण, पाच तोळ्यांचा नेकलेस, दहा तोळ्यांचे दोन तोडे, दहा तोळ्यांच्या चार बांगड्या, दोन तोळ्यांची कर्णफुले, चांदीच्या खड्याचे मंगळसूत्र असा 14 लाख 81 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. जेवण झाल्यानंतर माने कारजवळ आले. तेव्हा त्यांना काच फोडल्याचे व आतील सीटवरील पर्स लांबविल्याचे लक्षात आले.

Back to top button