कोल्हापूर : कलानगरीच्या भाग्यविधात्याला मुजरा | पुढारी

कोल्हापूर : कलानगरीच्या भाग्यविधात्याला मुजरा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘हिरे-माणके-सोने उधळा जयजयकार करा, जय राजर्षी शाहूराजा तुजला हा मुजरा… आदर्शच तू लोकनायका, धर्मसंस्कृतीचा अग्रदूत तू समाजपुरुषा समता क्रांतीचा…शाहिरांचा रणमल्लांचा जिवलग तू मानी… जय राजर्षी शाहूराजा तुजला हा मुजरा’, अशा भावनेने कलानगरी कोल्हापूरच्या भाग्यविधात्याला मानाचा मुजरा करण्यात आला.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वअंतर्गत शुक्रवारी शाहू मिल येथे ‘स्वरांजली लोकराजाला’ हा कार्यक्रम झाला. शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, गुणिदास फाऊंडेशन आणि गायन समाज देवल क्लब यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला. मृणालिनी परुळेकर यांचे व्हायोलिन वादन, गुरुनाथ ढोले, प्रदीप जिरगे, भूषण साठम, ऋतिक साठम या वाद्यवृंदाने सादरीकरण केले. गौतमी चिपळूणकर आणि पं. विनोद डिग्रजकर यांनी शास्त्रीय गायन, तर डॉ. भाग्यश्री मुळ्ये, महेश हिरेमठ, शुभांगी जोशी, करण कागले यांनी सुगम संगीत सादर केले. लोकराजा राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन देवल क्लबचे विनोद डिग्रजकर, विनोद ठाकूर-देसाई, निखिल भगत, गुणिदास फाऊंडेशनचे राजप्रसाद धर्माधिकारी व शिरीष सप्रे, देवल क्लबचे दिलीप गुणे, श्रीकांत डिग्रजकर, सचिन पुरोहित यांच्या हस्ते झाले.

Back to top button