पन्हाळा मुख्य रस्ता आता आठवड्यात खुला होणार | पुढारी

पन्हाळा मुख्य रस्ता आता आठवड्यात खुला होणार

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा पन्हाळा मुख्य रस्त्याचे काम पूर्ण होत असून या आठवड्यात रस्ता खुला करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात या रस्त्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर त्वरित या रस्त्यावरून वाहतूक सुरू करू, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पन्हाळा उपविभागाचे उपअभियंता चंद्रकांत आयरेकर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

पन्हाळा येथील मुख्य रस्ता अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचला होता. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे बांधकाम सुरू असून सुमारे आठ कोटी रुपयांची तरतूद यासाठी केली होती.

जियो ग्रेड तंत्रज्ञान वापरून हा रस्ता बांधण्यात आला आहे. हा रस्ता भक्कम व सुरक्षित होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या रस्त्याचे बांधकाम व्यावसायिक शिवाजी मोहिते करीत आहेत. या कामात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, यासाठी त्यांनी दक्षता घेतली आहे.

Back to top button