Goa Liquor Seized | गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त

नवलेनजीक कारवाई : कारसह दोघे ताब्यात
Goa Liquor Seized |
Goa Liquor Seized | गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्तPudhari
Published on: 
Updated on: 

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील नवले गावाच्या ओढ्यावरील पुलावर बेकायदा गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या आणि क्रेटा कार असा एकूण १६ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कृष्णा रमेश गुरव (वय ४०) व मयुरेश शेखर घाडी (दोघे रा. माझगाव-गरड, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांना मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी सापळा रचून पकडले. ७५० मिलीच्या विविध कंपन्यांच्या ३०० बाटल्या, तसेच १८० मिलीच्या २ हजार ६४० बाटल्या असा मोठ्या प्रमाणात मद्यसाठा सापडला. पोलिसांनी सुमारे ४ लाख ४९ हजार ४०० रुपये किमतीचा मद्य साठा व वाहतुकीसाठी वापरलेली ११ लाख किमतीची ह्युंदाई क्रेटा (एमएच ०५ सीएम ५३०७) जप्त केली. पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल स्वप्निल मोरे, अमिर नदाफ, महादेव पोवार, संदीप लाड, तानाजी डवरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क), (ई) अन्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अमिर नदाफ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news