कोल्हापूर : कॉम्रेड नामदेव गावडे यांचे निधन | पुढारी

कोल्हापूर : कॉम्रेड नामदेव गावडे यांचे निधन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, राज्य सचिव मंडळ सदस्य आणि राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य‌ तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेव गावडे यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा भाकपचे सचिव कॉम्रेड सतीश कांबळे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील बीड या गावी आजच दुपारी २ वाजता त्यांना शेवटचा निरोप देण्यात येणार आहे.

Back to top button