

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून मेरीड (इंडिया) कोल्हापूर, या संस्थेच्या 'नेटवर्क २४/७' या नाटकाला प्रथम तसेच शिवाजी विद्यापीठ संगीत व नाटयशास्त्र विभाग, कोल्हापूर या संस्थेच्या अंधायुग या नाटकास द्वितीय पारितोषिक पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. युवक मित्र मंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या 'गगन दमामा बाज्यो' या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
२३ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२२ या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री देवीदास आमोणकर, राजेंद्र पाटणकर आणि सुहास खंडारे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कोल्हापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे