Rabies Deaths | कोल्हापूर जिल्ह्यात ६ वर्षांत रेबीजमुळे १४ जणांचा मृत्यू

तब्बल ३ लाख ६४ हजार नागरिकांचे लचके तोडले
Rabies Deaths |
Rabies Deaths | कोल्हापूर जिल्ह्यात ६ वर्षांत रेबीजमुळे १४ जणांचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, श्वानदंशाच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. गेल्या सहा वर्षांतील आकडेवारीनुसार २०२१ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात तब्बल तीन लाख ६४ हजार २३३ जणांचे लचके श्वानांनी तोडले आहेत. या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील एक मृत्यू हा नोव्हेंबर २०२६ मधील आहे. २०२५ मध्ये सर्वाधिक ९३ हजार ४० जणांचा चावा श्वानांनी घेतला आहे. ही आकडेवारी केवळ चिंताजनक नाही, तर नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारी आहे.

गंभीर लक्षणे

पाणी पिण्यास त्रास होणे.

पाणी पिताना घशाचे स्नायू

आकुंचन पावणे.

वाऱ्याची भीती वाटणे.

अस्वस्था आणि आक्रमक वर्तन.

गोंधळलेली मानसिक अवस्था.

जास्त लाळ सुटणे.

झटके येणे.

पक्षाघात होणे.

रेबीजची लक्षणे

१. ताप येणे

२. डोकेदुखी

३. अशक्तपणा आणि थकवा जाणवणे.

४. मळमळ व उलट्या होणे.

५. चावा घेतलेल्या जागी वेदना.

६. खाज किंवा मुंग्या येणे.

रेबीजपासून बचावासाठी काय करावे?

कुत्रा किंवा अन्य प्राण्याने चाव घेतल्यानंतर जखम साबणाने धुवावी.

तातडीने शासकीय रुग्णालयात जावे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक लस घ्या.

गरजेनुसार रेबीज इम्युनोग्लोब्युलिन घ्या.

जखमेला हळद, तेल किंवा घरगुती उपाय टाळावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.