कोल्हापूर : मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या

कोल्हापूर : मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या

Published on

गडहिंग्लज ; पुढारी वृत्तसेवा : गेली अठरा वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली एकुलती मुलगी बेपत्ता झाल्याने त्याचा विरह सहन न झालेल्या पित्याने चक्क मृत्यूला कवटाळल्याची घटना गडहिंग्लज तालुक्यातील कळविकट्टे गावात घडली. रामा शट्याप्पा ईरगार (वय 52) असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे.

रामा यांना 18 वर्षांची एकुलती मुलगी होती. घरात पत्नी, मुलगी व ते असे तिघेजण राहत. हसत-खेळत असलेल्या या कुटुंबातील ही मुलगी बेपत्ता झाल्याने रामा प्रचंड अस्वस्थ झाले होते. यातूनच निराश होऊन मानसिक तणावातून त्यांनी घरातील लाकडी तुळईला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचा भाचा दीपक नाईक यांनी याबाबत हलकर्णी पोलिसांत वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news