महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा सांगलीतील सराईत जेरबंद

महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा सांगलीतील सराईत जेरबंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सराईत चोरट्याला ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या.

विशाल विलास कुडचे (वय ३९, रा. माधवनगर रस्ता, चिंतामणीनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. तो मुळचा इचलकरंजी येथील तांबे मळा येथील रहिवाशी आहे. चौकशी दरम्यान त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ६ सांगली जिल्ह्यातील ५ अशा एकूण ११ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण निरीक्षक संजय गोरले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

800 वर्षांपूर्वीचं गोंदेश्वराचं प्राचीन मंदिर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news