Tawde hotel illegal construction | तावडे हॉटेल परिसरातील 125 बांधकामांवर पडणार थेट हातोडा

आयुक्त डॉ. भारूड यांना सर्वेक्षणाचा अहवाल सादर
Tawade Hotel area survey
Tawade Hotel
Published on
Updated on

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांच्या सर्वेक्षणाचा अहवाल आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांना बुधवारी (दि. 29) सादर झाला. आयुक्तांनी 204 बांधकामांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले.

न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश असतानाही अवमान करून बांधलेल्या 88 अन् ‘ब्ल्यू लाईन’मधील 37 बांधकामे 7 दिवसांच्या नोटिसीनंतर थेट पाडण्याचे आदेश गुरुवारी (दि. 30) दिले जाणार आहेत. उर्वरित 79 बेकायदेशीर बांधकामांना बांधकाम परवाना कोणाकडून घेतला, त्यासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास 7 दिवसांची नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

तावडे हॉटेल परिसरातील उचगाव ग्रामपंचायतीने दावा केलेली जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 22 एप्रिल रोजी दिला आहे. त्यानंतर महापालिकेने या जागेवरील बेकायदेशीर बांधकामांचा 24 व 25 एप्रिल रोजी सर्व्हे केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news