Rare Species Discovery | निसर्गाच्या कुशीत दडलेले १२० जीव आणले प्रकाशात!

‘ठाकरे वाईल्डलाईफ’ची ऐतिहासिक कामगिरी; केवळ १३ सदस्यांच्या टीमने लावले शोध
Rare Species Discovery |
Rare Species Discovery | निसर्गाच्या कुशीत दडलेले १२० जीव आणले प्रकाशात!
Published on
Updated on

अर्जुन नलवडे

कोल्हापूर : मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक अधिवास वेगाने नष्ट होत असल्यामुळे लाखो वर्षांत उत्क्रांत झालेल्या प्रदेशनिष्ठ जीवांच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक जीव नष्ट होण्याची भीती संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे. असे असताना ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ (टीडब्ल्यूएफ) अशा दुर्मीळ आणि विज्ञानासाठी अपरिचित असलेले जीव प्रकाशात आणत आहे. फाऊंडेशनच्या केवळ १३ सदस्यांच्या टीमने १२० नव्या प्रजातींच्या आणि ३ कुळांचा शोध लावला आहे.

या १२० प्रजाती भारत, नेपाळ, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि अंगोला या चार देशांमध्ये शोधण्यात आल्या. १०८ प्रजातींचा शोध एकट्या भारतात लागला आहे. हे शोध प्रामुख्याने पश्चिम घाट आणि इंडो-बर्मा या जागतिक जैवविविधतेच्या हॉटस्पॉटसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

जैवविविधतेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज

तेजस ठाकरे यांच्या मते, भारतातील नैसर्गिक अधिवासांमध्ये काम करताना आपल्या देशाच्या नैसर्गिक संपदेची अफाट व्याप्ती आणि विलक्षण समृद्धी याची जाणीव होते. परंतु, विकासाच्या वेगामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जैवविविधतेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

टीडब्ल्यूएफने शोधलेल्या काही लक्षणीय प्रजाती

निमास्पिस कळसूबाईएन्सिस (कळसूबाई गोल बुबुळाची पाल) : महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ परिसरात आढळते.

निमास्पिस कळसूबाईएन्सिस
निमास्पिस कळसूबाईएन्सिस

मिनर्व्हार्या घाटीबोरीआलिस (महाबळेश्वर रातकीडा बेडूक) : उत्तर-पश्चिम घाटातील हा बेडूक अज्ञात उभयचर विविधतेची ओळख करून देतो.

मिनर्व्हार्या घाटीबोरीआलिस
मिनर्व्हार्या घाटीबोरीआलिस

टायटनइडिओप्स कोल्हापूरएन्सिस (कोल्हापूर दारकरी कोळी) : कोल्हापूर परिसरातील माळरानांवर आढळतो.

टायटनइडिओप्स कोल्हापूरएन्सिस
टायटनइडिओप्स कोल्हापूरएन्सिसAkshay Khandekar

शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचो मासो) : हिरण्यकेशी नदीत सापडलेला हा ‘लोच’ मासा नदी संवर्धनाचे प्रतीक बनला आहे.

शिस्टुरा हिरण्यकेशी
शिस्टुरा हिरण्यकेशीHemant Ogale

लॅगोचिलस हायाओमियाझाकी (तिलारी केसाळ गोगलगाय) : प्रसिद्ध जपानी चित्रपट निर्माते हायाओ मियाझाकी यांचे नाव दिलेली ही प्रजाती वनवे आणि जंगलतोडीमुळे धोक्यात आहे.

लॅगोचिलस हायाओमियाझाकी
लॅगोचिलस हायाओमियाझाकी

कॉम्पसोबुथस सातपुराएन्सिस (सातपुडा विंचू) : जळगावमध्ये सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आढळलेली ‘कॉम्पसोबुथस’ गटातील महाराष्ट्रातली ही पहिलीच नोंद.

कॉम्पसोबुथस सातपुराएन्सिस
कॉम्पसोबुथस सातपुराएन्सिस

मिट्रेफोरा रश्मिएई (वनस्पती) : तेजस ठाकरे यांना निसर्गाविषयी आवड निर्माण करण्यास प्रेरित करणाऱ्या त्यांच्या आईच्या (रश्मी ठाकरे) नावावरून या वनस्पतीला नाव दिले गेले आहे.

मिट्रेफोरा रश्मिएई
मिट्रेफोरा रश्मिएई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news