

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. पहिल्या फेरीत सुमारे 21 हजार विद्यार्थ्यांची अलॉटमेंट झाली असून सोमवारपासून (दि. 30) कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहेत.
यावर्षी प्रथम राज्यस्तरावर एकावेळी अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी 285 कनिष्ठ महाविद्यालयांतील 66 हजार 10 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. व्यवस्थापन, इन-हाऊस कोट्यामध्ये 1579 प्रवेश पूर्ण झाले आहेत. 28 जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यानुसार 7 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. 9 जुलैला दुसरी फेरी सुरू होणार आहे.