Multi-Level Parking | बहुमजली पार्किंगसाठी १ कोटी १८ लाखांची निविदा मंजूर

सरस्वती टॉकीजजवळील महापालिकेचे पार्किंग; एस. टी. स्टँडवरील पार्किंगसाठी २२ लाख
municipal corporation
Multi-Level Parking | बहुमजली पार्किंगसाठी १ कोटी १८ लाखांची निविदा मंजूर
Published on
Updated on

कोल्हापूर : सरस्वती टॉकीजजवळ असलेल्या महापालिकेच्या बहुमजली पार्किंगचे खासगीकरण करण्यात आले आहे. त्याचा ठेका एक वर्षासाठी तब्बल १ कोटी १८ लाखांना देण्यात आला. तसेच एस. टी. स्टँड येथील पे अँड पार्किंगचा ठेका एक वर्षासाठी २२ लाखांना दिला. दोन्ही निविदांचे प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आले. सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

महापालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटलमध्ये गर्भवतींना सात दिवस मोफत नाश्ता, जेवण पुरविणे ठेकेदाराने बंद केले आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून ते टेंडर इतरांना द्यावे, अशी सूचना नगरसेवकांनी केली. पाणी मीटरसाठी स्मार्ट मीटर बसवावेत, अशी सूचना नगरसेवकांनी केली. यावेळी झालेल्‍या चर्चेत प्रतिज्ञा उत्तुरे, इंद्रजित बोंद्रे, प्रताप जाधव, पूर्वा राणे, आदिल फरास, अमर समर्थ, अभिजित मोकाशी, नेहा तेंडुलकर, प्रवीण सोनवणे, अनुराधा खेडकर आदींनी भाग घेतला.

शहरात १५ उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव

कोल्हापूर शहरात वाढती वाहतूक व वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून नवीन उड्डाण पूल तयार करावेत, त्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशी सूचना नगरसेवकांनी केली. प्रशासनाच्या वतीने शहरात १५ उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. राज्य शासनाकडून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी गेला असल्याची माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news