

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील कनवाड येथील कृष्णा नदीवर सुरू असलेल्या बंधार्याच्या बांधकामामुळे स्थानिक शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. पिल्लर खुदाईसाठी वापरण्यात आलेल्या जास्त क्षमतेच्या भूसुरुंगामुळे परिसरातील जमिनीचा नैसर्गिक स्तर हादरला असून, त्यातच नदीत पाणी अडवण्यासाठी घातलेला कॉपर डॅम वेळेत न काढल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला आणि गट नंबर 175 ते 200 मधील सुमारे 10 एकर शेती वाहून गेली आहे. या शेतीत असणारा पाणी मोजणीचा मनोरा देखील कोसळला आहे.
या दुर्घटनेमुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय बंधार्याचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका संतप्त शेतकर्यांनी घेतली आहे. दरम्यान अंदाजे 10 एकर शेती आणि मळी शेतातील माती ही मोठ्या प्रमाणात वाहून गेली असल्याचे तलाठी दिगंबर शिकलगार, उपसरपंच दादासो कुपाडे यांनी सांगितले.