

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि. 13) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापूर विभागातून 1 लाख 32 हजार 926 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यावर्षी पंधरा दिवस अगोदर निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील 2,435 शाळांमधून
1 लाख 32 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 14 ते 28 मे या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
कुठे पाहता येईल निकाल :
https:///result.digilocker.gov.in
https:///sscresult.mahahsscboard.in
https:///sscresult.mkcl.org