

कोल्हापूर : येथील लक्ष्मीसेन जैन मठात अक्षयतृतीयेदिवशी 1008 श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या 28 फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात आला. हा 64 वा वार्षिक पूजा महोत्सव सोहळा शुक्रवार पेठेतील जैन मठ परिसरात झाला. जगद्गुरू स्वतीश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी तत्त्वार्थनंदी महाराज यांच्या सानिध्यात, पद्मनंदी महाराज, जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी सात वाजता सुभाष अनुस्कुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आठ वाजता महावीर निलजगी यांच्या हस्ते मंदिरातील मूलनायक भगवान 1008 चंद्रप्रभ तीर्थंकरांची पंचामृत अभिषेक व ज्वालामालिनी देवीची पूजा करण्यात आली. यंदाच्या आदर्श दाम्पत्य पुरस्काराने महावीर निलगजी यांना सन्मानित करण्यात आले. सायंकाळी महास्वामींच्या सानिध्यात झालेल्या या महामस्तकाषिभेक सोहळ्याप्रसंगी 108 कलशांतून 13 प्रकारच्या द्रव्याने मूर्तीवर अभिषेक करण्यात आले. महावीर निलजगी यांच्या हस्ते तूप, दही यांचा प्रथम कलश अभिषेक करण्यात आला. एम. के. हुबळी यांच्या हस्ते नारळपाणी, सुशील जैन यांच्या हस्ते उसाचा रस, गुणमाला पंड्या यांच्या हस्ते आमरस, महावीर निलजगी यांच्या हस्ते दूध, भरतेश सांगरुळकर यांच्या हस्ते
सर्वोषधीरस, पीयूष बिराजे यांच्या हस्ते कलकचूर्ण, शुभम खोत यांच्या हस्ते कषायचूर्ण, वीरकुमार जैन यांच्या हस्ते श्वेत चंदन, संतोषकुमार मेहता यांच्या हस्ते रक्तचंदन, किरण शिराळे यांच्या हस्ते हळदचूर्ण, वैशाली पाटील यांच्या हस्ते कुंकू, प्रदीप पाटील यांच्या हस्ते अष्टगंध, अजित शेट्टी यांच्या हस्ते पूर्ण सुगंधित कलषाभिषेक, सुरेखा पाटील यांच्या हस्ते शांती धारा असे अभिषेक करण्यात आले. यावेळी सुरेश मगदूम, अजित सांगावे, संजय आडके, सुरेश रोटे, धनंजय मगदूम यांनी या सोहळयाचे नियोजन केले.