kolhapur | जिल्ह्यात धावणार १०० जादा बसेस

रक्षाबंधन, ईदसह सलग सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी टाळण्‍यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन
kolhapur |
kolhapur | जिल्ह्यात धावणार १०० जादा बसेस
Published on
Updated on

कोल्‍हापूर : भाऊ-बहिणीच्‍या प्रेमाचा सण असलेल्या ‘रक्षाबंधन’ सणासाठी होणारी गर्दी लक्षात घेत एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. यंदा सणाच्‍या काळात जिल्‍ह्यातील विविध आगारांतून १०० जादा एसटी बसेस धावणार आहेत.

येत्‍या बुधवारी (दि. २६) ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी, शुक्रवारी (दि. २८) रक्षाबंधन आणि त्यानंतर शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या असा सलग सुट्ट्यांचा योग आला आहे. त्यामुळे गावाकडून शहराकडे आणि शहरातून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन एसटीने आगारनिहाय व मार्गनिहाय नियोजन केले आहे.

कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा आणि आजरा या आगारांतून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी मागणीनुसार अतिरिक्त वाहतूक उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासह प्रमुख बसस्‍थानकांवर प्रवाशांना योग्य बस, मार्ग व जादा फेऱ्यांची माहिती देण्यासाठी ‘प्रवासी मित्र’ नियुक्‍त करण्यात आले असून, मार्गस्‍थ निवाऱ्यांवरही एसटी कर्मचारी तैनात राहणार आहेत.

प्रवाशांसाठी विशेष व्यवस्‍था

* प्रमुख बसस्थानकांवर ‘प्रवासी मित्र’ नियुक्त

* बस, मार्ग व जादा फेऱ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध

* मार्गस्थ निवाऱ्यांवर एसटी कर्मचारी तैनात

* गर्दीच्या ठिकाणी मागणीनुसार अतिरिक्त बसेसची व्यवस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news