

हुपरी : विक्रीसाठी गांजाची वाहतूक करणार्या मोहीन मोहिद्दिन मुजावर (वय 27 ) याला एक किलो 600 ग्रॅम गांजासह 1 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषणने शुक्रवारी रात्री रंगेहाथ पकडला. याप्रकरणी गुन्हे अन्वेषणने मोईनसह त्याचा साथीदार यासीन खुद्बुद्दिन मुल्ला (दोघे रा. संभाजीराव माने नगर, हुपरी) यांच्या विरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यातील यासिन मुल्ला हा घटनेनंतर पळून गेल्याने अद्याप तो मिळालेला नाही.
हुपरी परिसरातील गावागावांत गांजासह विविध प्रकारच्या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. परिसरातील तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी जाऊन नशेली बनल्याचे वास्तव गावागावांत पहावयास मिळते. याप्रश्नी शिवसेनेने (शिंदे सेना) डिजिटल फलक उभारून समाजप्रबोधन करण्याबरोबरच पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून सत्य परिस्थिती कथन करून अमली पदार्थ तस्करावर कारवाई करण्याची मागणी केली होती.