

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा रॉनिक अप्लायन्सेस यांच्या वतीने कोल्हापुरात दैवज्ञ बोर्डिंगसमोरील राधा गोविंद प्लाझा येथे व इचलकरंजी येथे रॉनिक अप्लायन्स टेलिफोन भवनसमोर वारणा बँकेशेजारी वॉटर हिटर सिस्टिमचे प्रदर्शन आजपासून आयोजित केले आहे. पावसाळा असो किंवा हिवाळा या दिवसांत अनेक ग्राहक बाजारपेठेत वॉटर हीटरचे पर्याय शोधायला सुरुवात करतात. ग्राहकांची गरज आणि मागणी याचा विचार करून कंपनीने ही सिस्टिम बाजारात आणली आहे.
या सिस्टिमद्वारे आपल्याला केवळ काही सेकंदांत पाणी गरम मिळणार आहे. विजेच्या एका युनिटमध्ये 70 ते 100 लिटर गरम पाणी मिळणार आहे. या हिटरची बॉडी फायबरची असून हीट प्रुफ असून शॉक लागणे किंवा गंज लागणे असे कोणतेही प्रकार होत नाहीत. सुरक्षिततेसाठी यात इटालियन थर्मल कट ऑफ सिस्टिम असून या सिस्टिममध्ये आयएसआय प्रमाणित थर्मोस्टेट व एलिमेंट कॉईल वापरली आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या सिस्टिमचा लाभ देशातील लाखो ग्राहकांना होत असून ते सिस्टिमच्या उपयोगितेबद्दल अत्यंत समाधानी आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे.