

पेठवडगाव : पुढारी वृत्तसेवा येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शहरातील 10 प्रभागांत 20 नगरसेवक अशा द्विसदस्यीय प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.दरम्यान, 2011 च्या जनगणनेनुसार एकूण 25 हजार 651 लोकसंख्या आहे. दहा प्रभागांत सरासरी 2329 ते 2784 लोकसंख्या प्रत्येकी प्रभागात विभागली आहे.
प्रभाग क्र. 1 : लोकसंख्या 2547, या प्रभागात अशोकराव माने फार्मसी कॉलेज, डी मार्ट गोडावून, छ.शिवाजी महाराज चौक, शारदा विद्या मंदिर परिसर.
प्रभाग क्र. 2 : लोकसंख्या 2329, या प्रभागात सिद्धार्थनगर, किणी रोड पूर्व- पश्चिम बाजू पोळ गल्ली अंबा रोड,
प्रभाग क्र. 3 : लोकसंख्या 2647, या प्रभागात मातंग वसाहत पासून भादोले रोड, तुकाईनगर, विद्या कॉलनी, नवीन वसाहत, लाटवडे रोड उत्तर बाजू, सुतारकी, रामनगर.
प्रभाग क्र.4 : लोकसंख्या 2467, सणगर गल्ली, कुंभार गल्ली मधील भाग, अडत लाईन, नवीन वसाहत, शिवाजी नगर, कल्याणी कॉलनी, लाटवडे रोड दक्षिण बाजू,
प्रभाग क्र 5 : लोकसंख्या 2382, पोळ गल्ली, आंबा रोड, गांधी चौक, मकोटे गल्ली, बस्ती रोड, नुककड कॉर्नर, भजनी गल्ली, ठाकर गल्ली.
प्रभाग क्र 6 : लोकसंख्या 2471, नागोबा गल्ली, साबळे वाडा, छ.संभाजी उद्यान,पद्मा रोड, सावरकर चौक, सुतार गल्ली, विठ्ठल मंदिर परिसर, तांबवे वसाहत, नवरत्न नगर, यशवंतनगर.
प्रभाग क्र.7 : लोकसंख्या 2781, अंबप रोड, कारवान वसाहत, नागोबा वाडी, सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक, पानमळा, स्मशानभूमी, वेताळमाळ, गुरव मळा, मंगरायाची वाडी.
प्रभाग क्र 8 : लोकसंख्या 2777, कोल्हापूर रोड, गणेश मंदिर, गणेश कॉलनी, राऊत सर कॉलनी,पन्हाळकर वसाहत, महालक्ष्मी वसाहत, कबाडे गल्ली, हनुमान रोड, कैकाडी गल्ली.
प्रभाग क्र 9 : लोकसंख्या 2466,गांधी चौक, अडत लाईन, एस. टी. स्टँड परिसर, डवरी गल्ली, यादव कॉलनी, मकोटे गल्ली भाग, भजनी मंडप, कैकाडी गल्ली.
प्रभाग क्र 10 : लोकसंख्या 2784, बावडेकर कॉप्लेक्स, दिघे कॉलनी, वडगाव हायस्कूल, पोलिस स्टेशन, शाहू कॉलनी, हातकणंगले रोड दक्षिण बाजू, वडगाव हायस्कूल मागील भाग, इंदिरा वसाहत, सहारा चौक, सूर्यवंशी कॉलनी, गोसावी गल्ली, अपराध वसाहत आदी परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
प्रभाग रचनेनुसार 10 प्रभागांत 20 नगरसेवक पैकी 10 महिला नगरसेवक असणार आहेत. अनुसूचित जाती 3 तर खुल्या गटासाठी 8 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 25 हजार 651 असून अनुसूचित जाती 3764 आणि अनुसूचित जमाती 142 जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व व्याप्ती निश्चित करण्याचे ठरविण्यात आले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.