रत्नागिरीत 3 हजार 77 नौकाही बंदरांमध्येच उभ्या

रत्नागिरीत 3 हजार 77  नौकाही बंदरांमध्येच उभ्या

रत्नागिरी;  पुढारी वृत्तसेवा : पूर्व किनार्‍यावर वादळसद़ृश स्थिती निर्माण झाल्याने केरळ, तामिळनाडूतील मच्छीमार नौका मिर्‍या बंदर येथे आश्रयाला आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व मच्छीमार नौकासुद्धा किनार्‍यावरच उभ्या असल्याचे साहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणार्‍या 3 हजार 77 नौका आहेत. यामध्ये 3 हजार 519 यांत्रिकी तर 442 बिगर यांत्रिकी नौका असून, या सर्व नौकांची मासेमारी ठप्प आहे.

आश्रयाला आलेल्या सर्व परप्रांतीय नौकांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक ती मदत केली जाणार असल्याचेही सहाय्यक आयुक्तांना सांगितले. गेल्या चार दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.त्यामुळे सर्वत्र पाऊस सुरु असून या कमी दाबाच्या पट्ट्याची चक्रीवादळात रुपांतर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना नौकांना समुद्रात नेऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बंदरांवर नौका उभ्या असल्याने मासेमारी पूर्णपणे ठप्प आहे.

हवामानाच्या अंदाजानूसार 5 डिसेंबरपर्यंत सावधानतेचा इशारा आहे. परंतु, गुरुवारी दुपारनंतर पाऊस थांबून ऊन पडले. वातावरण निवळले असल्याने मच्छीमार नौका शुक्रवारपासून मासेमारीसाठी समुद्रात जाण्याच्या शक्यता आहे. शुक्रवारच्या दिवशी पर्ससीननेट मासेमारी बंद असते. परंतू गेले दोन दिवस मासेमारी बंद राहिल्याने यातील अनेक नौका सुद्धा मासेमारीसाठी समुद्रात जाण्याची शक्यता आहे.

पूर्व किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने केरळ, तामिळनाडू आदी ठिकाणच्या मच्छीमार नौका आश्रयासाठी मिर्‍या बंदरात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news