Sindhudurg Political News | युवा नेते विशाल परब पुन्हा राजकारणात सक्रिय होणार!

Upcoming local elections | आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Sindhudurg Political News
विशाल परब(Pudhari File Photo)
Published on
Updated on

हरिश्चंद्र पवार

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून सुमारे 33,281 मते मिळवणारे युवा नेते आणि उद्योजक विशाल परब यांच्या राजकीय पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून दूर असलेले परब लवकरच सक्रिय राजकारणात दिसण्याची शक्यता आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विशाल परब यांनी मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून चांगली मते मिळवल्याने त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फळीचा फायदा घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप), शिंदे गट शिवसेना, उद्धव ठाकरे गट शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

Sindhudurg Political News
Sawantwadi News | दगडांच्या फटीत पाणी गेल्याने भिंत कोसळली!

गेल्या पाच वर्षांत विशाल परब यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यासोबत तरुण कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे. विधानसभेला अपेक्षित यश न मिळालं तरी त्यांनी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी त्यांच्यासारख्या युवा आणि जनाधार असलेल्या नेत्याची गरज राजकीय पक्षांना भासत आहे. त्यांनी वेंगुर्ले तालुक्यापासून आपल्या कामास प्रारंभ केल आहे समाजकारणातून त्यानी पुन्हा एकदा सुरुवात केली असून त्यांची एन्ट्री राजकारणात निश्चित मानण्यात येत आहे.

Sindhudurg Political News
Sawantwadi Politics News | माफी मागा; अन्यथा शिवसेना कार्यालयासमोर ‘तिरडी आंदोलन’!

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तीन पंचायत समित्या, दोन नगरपालिका आणि 11 जिल्हा परिषद सदस्यांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला एका प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. तर शिवसेनेकडे आ. दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब आणि सचिन वालावलकर यांसारखे नेते आहेत. उद्धव ठाकरे गटाकडे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आहेत. भाजपकडे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह मनीष दळवी, महेश सारंग, प्रमोद कामत आणि लखम सावंत-भोसले यांसारख्या जुन्या कार्यकर्त्यांची फळी आहे. माजी आमदार राजन तेली हे देखील लवकरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे-परब निवडणुकीनंतर फारशा सक्रिय नसलेल्याने या मतदारसंघात नवीन नेतृत्वाची शक्यता वर्तवली जात आहे.

नव्या राजकीय भूमिकेची उत्सुकता

भाजप सध्या स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचेही विशाल परब यांच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे विशाल परब आगामी काळात कोणती राजकीय भूमिका घेणार, याबद्दल राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वेगळी ओळख

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विशाल परब यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकारणापासून काहीसे दूर राहिले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशाल परब यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी त्यांची जवळीक आहे. यापूर्वी ते भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर त्यांचे हे पद तात्पुरते गोठवण्यात आले होते.भाजप त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याच्या विचारात आहे. यासोबतच शिंदे गट शिवसेना, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news