Sawantwadi Vikas Sawant Funeral | विकास सावंत अनंतात विलीन

Political leaders attend funeral | अंत्यदर्शनासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह शेकडो नागरिकांची गर्दी
Sawantwadi Vikas Sawant Funeral
सावंतवाडी : विकास सावंत यांचे अंत्यदर्शन घेताना माजी मंत्री आ. दीपक केसरकर. सोबत राजू शेट्टी, बबन साळगावकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, मनिष दळवी, प्रभाकर सावंत, इर्शाद शेख, संजू परब, संदेश पारकर, बाबुराव धुरी रुपेश राऊळ आदी(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सावंतवाडी : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपूत्र, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत (वय 62) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी माजगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी सकाळी राणी पार्वती देवी हायस्कूल सभागृहात विकास सावंत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहत पुष्पांजली अर्पण केली. माजी मंत्री आ. दीपक केसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, रुपेश राऊळ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली.

Sawantwadi Vikas Sawant Funeral
Sawantwadi News | दगडांच्या फटीत पाणी गेल्याने भिंत कोसळली!

विकास सावंत यांनी आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शाळा हाच त्यांचा ध्यास होता. त्यांच्या अकाली निधनान ‘एका समर्पित जीवनाचा’ अंत झाल्याची भावना आ. दीपक केसरकर, सासरे रामदास नीलख यांनी व्यक्त केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शोक व्यक्त करत सावंत परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशा भावना व्यक्त केल्या. राणी पार्वती देवी हायस्कूल येथून यानंतर त्यांचे पार्थिव माजगाव येथील निवासस्थानी नेण्यात आले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी विकास सावंत यांना अखेरचा निरोप दिला. त्यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांचे उपस्थितांनी सांत्वन करत धीर दिला.

Sawantwadi Vikas Sawant Funeral
Sawantwadi Fishermen Protest | आरोंदा-हुसेनबागेतील मच्छीमारांवर बेघर होण्याची वेळ

व्ही. बी. नाईक, सी. एल. नाईक, डॉ. दिनेश नागवेकर, अशोक दळवी, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, अन्नपूर्णा कोरगावकर, अण्णा केसरकर, नीता राणे, समीर सावंत, महेंद्र सांगेलकर, बाबु कुडतरकर, प्रेमानंद देसाई, रमेश पै, अमोल सावंत, आनंद परूळेकर, सतीश बागवे, राजू मसूरकर, सुनील राऊळ, रवींद्र मडगावकर, अमरसेन सावंत, साक्षी वंजारी, समीर वंजारी, किरण टेंबुलकर, सतीश घोटगे, एल. पी. पाटील, बी. व्ही. मालवणकर, सिताराम गावडे, संतोष सावंत, काका मांजरेकर, के. टी. परब, मनोज नाईक, सोनाली सावंत, आनंद नेवगी, संजू शिरोडकर, तुषार वेंगुर्लेकर, नारायण सावंत, मेघश्याम काजरेकर, अभय पंडीत, बाळासाहेब पाटील, वसुधा मुळीक, हर्षवर्धन धारणकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, राजन म्हापसेकर, शैलेश पै, रविकिरण तोरसकर, अजय गोंदावळे, अ‍ॅड. नकुल पार्सेकर, भाई देऊलकर, हेमंत बांदेकर, गजानन गावडे, संपत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, अ‍ॅड. परिमल नाईक, अ‍ॅड. पी.डी. देसाई, सत्यजित धारणकर, शैलेश गौंडळकर, निशांत तोरसकर, आशिष सुभेदार, समीरा खलिल, तौकीर शेख, बाळा गावडे, आबा सावंत, भरत गावडे, संदिप कुडतरकर, चंद्रकांत कासार, शैलेश नाईक, कौस्तुभ पेडणेकर, बंटी पुरोहित, माया चिटणीस, संप्रवी कशाळीकर, अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, अरुण भिसे, सुनील पेडणेकर, शिवाजी सावंत, संदीप राणे, जगदीश धोंड, रवी जाधव, अभिजित सावंत, रामा वाडकर, अभय शिरसाट, सुधीर आडिवरेकर, अनामारी डिसोझा, जावेद खतिब, जेम्स बोर्जीस, मार्टीन आल्मेडा, संजय लाड, एस.पी. नाईक, प्रल्हाद सावंत, अनिल भिसे, सुमेधा नाईक, अजय सावंत, डॉ. अर्चना सावंत, महादेव पांगम, म.ल. देसाई, सुधीर पराडकर, बबन राणे, रवी सावंत,रेवती राणे, संदीप गवस, संतोष गांवस, संजय कानसे, सागर नाणोसकर,शामराव माने, अवधूत मालवणकर, केदार म्हसकर, नामदेव मुठे, अभिषेक कशाळीकर, रवी जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी विकास सावंत यांना आदरांजली अर्पण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news