

कणकवली : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल-कणकवली येथे नुकताच जागतिक औषध निर्माता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त कणकवली शहरात विद्यार्थ्यांनी औषध निर्माण क्षेत्राबद्दल जनजागृती करण्यासाठी व औषधांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फार्मा रॅली चे आयोजन केले होते.
फार्मा रॅलीचे उद्घाटन उद्योजक सतीश नाईक यांचे हस्ते करण्यात आले तसेच या रॅली मध्ये औषध निर्मात्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम पथनाट्य सादर केले. तसेच या रॅली दरम्यान कणकवली शहरातील सर्व फार्मासिस्ट बंधूंचे गुलाबपुष्प देऊन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ही रॅली सुरक्षित रित्या पार पडण्यासाठी कणकवली शहर पोलिस यांची मोलाची मदत लाभली. जागतिक औषध निर्माता दिन साजरा करण्यासाठी महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, रांगोळी वर्धा, घोषवाक्य लेखन या स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उप-प्राचार्य डॉ. अमोल उबाळे, विभाग प्रमुख अमर कुलकर्णी आणि नमिता सागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. निखिल गजरे, प्रा. ऋतुजा कांबळे, प्रा. नेहा गुरव व प्रा.शिवराम जाधव यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. युवक कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विशेष अभिनंदन आणि कौतुक केले. विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये साजरा झालेला जागतिक औषधनिर्माता दिन हा समाजामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये फार्मासिस्ट चे महत्व पटवून देणारा एक महत्त्वाचा प्रेरणादायी कार्यक्रम ठरला.