Vengurla Black Magic Fraud | वेंगुर्ल्यात जादूटोणा करणाऱ्या भोंदूगिरीचा पर्दाफाश

कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल!
Vengurla Black Magic Fraud |
Vengurla Black Magic Fraud | वेंगुर्ल्यात जादूटोणा करणाऱ्या भोंदूगिरीचा पर्दाफाशFile Photo
Published on
Updated on

मळगाव : वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील चार आरोपी विरोधात अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यांतर्गत वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उभादांडा येथे स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करून अघोरी कृत्ये, जादूटोणा व तथाकथित तिलस्मी उपचारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमुळे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या प्रवृत्तींवर पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय रोहिदास चौकेकर (वय ६३, रा. चौके, भवानीनगर, ता. मालवण) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत उभादांडा येथे आरोपींनी स्वतःकडे अलौकिक व दैवी शक्ती असल्याचे भासवून जादूटोणा व अघोरी प्रकारांच्या माध्यमातून लोकांकडून पैसे उकळले. तसेच, अशा कृत्यांद्वारे समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालत नागरिकांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी म्हणून अमृता अनिल कुबल, अनिल कुबल, मकरंद कुबल आणि मिताली मकरंद कुबल (सर्व रा. उभादांडा, ता. वेंगुर्ला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या चौघांनाही पुढील चौकशीसाठी वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news