Sindhudurg News : वेंगुर्लेत कोळंबीची बंपर आवक

किनाऱ्यावर मच्छीमारांची लगबग वाढली
Sindhudurg News
वेंगुर्लेत कोळंबीची बंपर आवक
Published on
Updated on

वेंगुर्ले : १५ ऑगस्टनंतर अधिकृत सागरी मच्छीमारी सुरुवात झाल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच स्थानिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात कोळंबी मिळाल्याने मच्छीमार सुखावला आहे.

गेले काही दिवस फक्त बांगडा मासा व इतर बारीक मासे कमी प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमार नाराज होता; मात्र रविवारी लहान कोळंबीपासून मोठ्या व्हाईट प्राॅन्स अशी कोळंबी मिळाल्याने दर्यावर्दी सुखावला असून किनाऱ्यावरचे लगबग वाढली आहे. तसेच मत्स्य खवय्यांनीही आपला मोर्चा समुद्राकडे वळवला असून थेट किनाऱ्यावर कोळंबी खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. या कोळंबीला प्रतवारीनुसार २०० रु., ३०० रु., ४०० रु. प्रतिकिलो असा चांगला दर मिळाला, तर व्हाईट प्रॉन्सला प्रतिकिलो ५०० रुपये दर मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news