Vengurla Municipal Council Election Result 2025 |वेंगुर्ला नगरपरिषदेवर भाजपचेच वर्चस्व ; दिलीप गिरप सलग दुसऱ्यांदा नगराध्यक्ष
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक (2025 -2030) निवडणूकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना थेट नगराध्यक्ष सह एकूण 20 पैकी 16 जागांवर विजय मिळविला.यामध्ये भाजपाचे दिलीप उर्फ राजन लक्ष्मण गिरप हे (2549 मते) एकूण 430 एवढ्या मताधिक्याने विजयी होत सलग दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येत करिष्मा केला आहे. तर शिवसेनेचे नागेश उर्फ पिंटू गावडे हे पराभूत झाले.
या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले. शिवसेना 1, ठाकरे शिवसेना 3 नगरसेवक विजयी झाले.राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार पराभूत झाले. दि.2 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली होती. तर आज रविवार 21 डिसेंबर रोजी वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे सकाळी 10 वा. पासून दुपारपर्यंत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरुळकर यांच्या, प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या सुयोग्य नियोजनात ही निवडणूक निकाल प्रक्रिया शांततेत व सुरळीत संपन्न झाली.
नगराध्यक्ष पदासाठीच्या 6 उमेदवारांना मिळालेली मते :
दिलीप लक्ष्मण गिरप, (भाजपा 2549 मते विजयी.).
नागेश मोहन गावडे,शिवसेना (2119 मते, पराभूत).
संदेश प्रभाकर निकम(839 मते, पराभूत, उद्धव ठाकरे शिवसेना).
विलास प्रभाकर गावडे (राष्ट्रीय काँग्रेस 1854 मते, पराभूत)
सोमनाथ वसंतराव टोमके ( अपक्ष 43 मते) व
नंदन मेघ:श्याम वेंगुर्लेकर ( 39 मते,अपक्ष)
नोटा : 71 मते
असे एकूण मतदान (7514 ) मतदान झाले.
प्रभाग क्र. 1 अ : लीना समीर म्हापणकर (शिवसेना विजयी 391 मते). प्रभाग क्र. 1 ब :रवींद्र रमाकांत शिरसाट (भाजपा विजयी, 259 मते ).
प्रभाग क्र. 2 अ : गौरी गणेश माईंणकर (भाजपा विजयी 348 मते). प्रभाग क्र. 2 ब : प्रीतम जगन्नाथ सावंत (भाजपा विजयी 355 मते).
प्रभाग क्र. 3 अ : विनायक (सुहास )सदानंद गवंडळकर (भाजपा 308 मते विजयी). प्रभाग क्र. 3 ब : गौरी सुदेश मराठे (भाजपा विजयी 436 मते).
प्रभाग क्र. 4 अ : आकांक्षा आनंद परब (भाजपा विजयी 540 मते). प्रभाग क्र. 4 ब :तातोबा महादेव पालयेकर (भाजपा विजयी 338 मते ).
प्रभाग क्र. 5 अ : सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर (भाजपा विजयी 207 मते). प्रभाग क्र. 5 ब : विनय अशोक नेरुरकर (भाजपा विजयी 148 मते).
प्रभाग क्र. 6 अ : रिया वासुदेव केरकर (भाजपा 261 मते विजयी). प्रभाग क्र. 6 ब : सदानंद तुळशीदास गिरप (भाजपा विजयी,241 मते).
प्रभाग क्र. 7 अ :काजल किरण कुबल (भाजपा विजयी 395 मते). प्रभाग क्र. 7 ब : सचिन भगवान शेट्ये ( भाजपा विजयी, 263 मते).
प्रभाग क्र. 8 अ : सुमन संदेश निकम ( ठाकरे शिवसेना विजयी 432 मते). प्रभाग क्र.8 ब : संदेश प्रभाकर निकम(ठाकरे शिवसेना विजयी 373 मते).
प्रभाग क्र. 9 अ : युवराज लक्ष्मण जाधव (भाजपा विजयी 295 मते). प्रभाग क्र. 9 ब : समीधा रोहित रेडकर (ठाकरे शिवसेना विजयी 369 मते).
प्रभाग क्र. 10 अ :प्रणव बाबली वायंगणकर (भाजपा विजयी 314 मते). प्रभाग क्र. 10 ब : शीतल ज्ञानेश्वर आंगचेकर(भाजपा विजयी 232 मते).
दिलीप गिरप हे सलग दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, सातेरी देवस्थानचे दाजी परब यांच्यासह पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.सायंकाळी उशिरा भाजपा युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्लात येत दिलीप गिरप यांचे अभिनंदन केले.

