Chain Snatching | वैभववाडी बसस्थानकातील सोनसाखळी चोरीचा छडा! कोल्हापुरातून संशयित महिलेला अटक

Chain Snatching | या प्रकरणी कोल्हापूर येथील सुरेखा राजू नरदे (वय ४५, रा. कोल्हापूर) या संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे.
Women Arrested
Women Arrestedfile
Published on
Updated on

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी बसस्थानकात आठवडे बाजाराच्या दिवशी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ लांबवल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आठ-दहा दिवसांत तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणी कोल्हापूर येथील सुरेखा राजू नरदे (वय ४५, रा. कोल्हापूर) या संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे.

Women Arrested
Kolhapur-Vaibhavwadi Railway Line | कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे फेरसर्वेक्षण होणार

तिच्यासोबत असलेल्या अन्य दोन महिला अद्याप फरार आहेत. संशयित सुरेखा नरदे हिने पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बुधवार, ९ सप्टेंबर रोजी वैभववाडीचा आठवडे बाजार असल्याने बसस्थानकात मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत वैभववाडी सडुरे-शिराळे एसटी बसमध्ये चढत असताना जयवंती तुकाराम पाटील या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे एक तोळे वजनाची आणि अंदाजे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची माळ अज्ञात व्यक्तीने खेचून नेली होती.

याबाबत त्यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उल्हास जाधव यांनी वैभववाडी शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये चोरीच्या घटनेपूर्वी बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तीन महिला आढळून आल्या.
पोलिसांनी या संशयित महिलांचे फोटो राज्यातील विविध पोलिस ठाण्यांना पाठवून त्यांची माहिती घेतली. तपासादरम्यान या महिलांपैकी दोघींचा अन्य चोरीच्या घटनांशी संबंध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी कोल्हापूर येथे जाऊन सुरेखा राजू नरदे तिला १९ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले.

Women Arrested
Kolhapur Vaibhavwadi Railway Project | कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी आणखी किती सर्वेक्षणे हवीत?

पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने वैभववाडी बसस्थानकातील सोनसाखळी चोरीची कबुली दिल्याचे समोर आले. मात्र चोरीचा मुद्देमाल तिच्यासोबत असलेल्या अन्य दोन महिलांकडे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे फरार दोन्ही महिलांचा शोध घेण्याबरोबरच चोरीची सोन्याची माळ हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, संशयित सुरेखा नरदे तिला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या कालावधीत पोलिसांकडून चोरीतील मुद्देमाल तसेच तिच्या साथीदारांचा शोध घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news