सिंधुदुर्ग : करून होलिकेला नमन, केले व्यसनांचे दहन!

नशाबंदी मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम
Sindhudurg News
कणकवली: अनोखी होळी साजरी करताना नशाबंदी मंडळ व पदर प्रतिष्ठानच्या महिला भगिनी.
Published on
Updated on

कणकवली ः सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र मुंबई, शाखा सिंधुदुर्ग आणि पदर प्रतिष्ठान कणकवली यांच्या विद्यमाने होळी निमित्त ‘करून होलिकेला नमन, केले व्यसनांचे दहन’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

उत्सव आला की व्यसनही सोबत आलीच पाहिजेत असा रिवाज अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा रिवाज मोडीत काढून व्यसनांना प्रतिबंध घालून आनंददायी उत्सव साजरा करावा, या उद्देशाने गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे कणकवली छत्रपती शिवाजी चौकात आयोजन करण्यात आले होते.

नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यसनमुक्त महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र व्हावा, व्यसनमुक्तीच्या कार्यात सामाजिक संस्थांनी सहभाग घेण्याची गरज स्पष्ट करत राज्यातील सध्यस्थितीत व्यसनांची परिस्थिती भयावह आहे. सर्वांच्या सहकार्याने व्यसनांना अटकाव करता येईल. जमलेल्या सर्व महिलांनी पुढाकार घेऊन घराघरात जाऊन जनजागृती करावी असे मत व्यक्त केले. नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व्यसनमुक्तीच्या ब्रँड अँबेसिडर अभिनेत्री अक्षता कांबळी आणि पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी दारू, गुटखा, सिगारेट, अमलीपदार्थ, गांजा,अफू, गर्द, ड्रग्स,चरस यांची वेष्टणे, आवरणे या सर्व व्यसनांची प्रतिकात्मक होळी पेटवली. अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी समाजातील व्यसनांचा समूळ नाश होईल व महाराष्ट्र व्यसनमक्त होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विचार व्यक्त केला. या वेळी सर्वांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला. मेघा गांगण यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात पुढाकार घेऊन व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले.

महिला दक्षता कमिटीच्या रोजा खडपकर,पदर महिला प्रतिष्ठान सचिव सुप्रिया नलावडे, प्रियाली कोदे, लीना काळसेकर, संजना सदडेकर, साक्षी वाळके, अंकिता कर्पे, राजश्री रावराणे, संपदा पारकर, प्रणाली चव्हाण, भारती पाटील, शांती सावंत, मनीषा मयेकर, पल्लवी करपे, पूजा माणगावकर, स्वानंदी कोदे, याज्ञवी कोदे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news