

मालवण : मालवण पोलिस ठाणे हद्दीत कर्ली नदी पात्रात काळसे -बागवाडी दरम्यान अनोळखी पुरुष मृतदेह स्थानिकांना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालय येथे ठेवला आहे. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शनिवारी सायंकळी हा मृतदेह स्थानिकांना दिसून आला.
सडलेल्या स्थितीतील हा मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वीचा असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून अंगावर लालसर नारंगी रंगाचे जॅकेट असून करडे रंगाचा टीशर्ट तर काळया रंगाची पॅन्ट आहे. परिसरात कोणी बेपत्ता आहे का, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत.