मालवण : डोळ्यांना थंड सुखद स्वास्थांचा अनुभव जागतिक वारसा म्हणून जाहीर झालेल्या किल्ले सिंधुदुर्गची पाहणी करण्यासाठी युनोस्कोची टीम ६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशांशी चर्चा केली. तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मालवण न. प. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक वारसा मालमत्तांच्या अनुक्रमांक नामांकनसाठी भारत सरकारने महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील एकूण १२ किल्ल्यांची निवड केली असून सदर किल्ले मराठा मिलिटरी लैंडस्केपमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव युनोस्कोकडे दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला व विजयदुर्ग किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण सांस्कृतीक मंत्रालयाचे केंद्रीय संरक्षित स्मारक असून सिंधुदुर्ग किल्ला व विजयदुर्ग किल्ला यांना वारसा मालमत्तांच्या अनुक्रमांक नामांकन मिळाले आहे. त्या अनुषंगाने सदर दोन्ही किल्ल्यांची पाहाणी व सर्वेक्षण करण्यासाठी युनोस्को तज्ज्ञ टीम ६ ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग व ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट दिली.