

आंबोली : आंबोलीत रविवारी असंख्य पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा रोमांच अनुभवला! रविवारी मुख्य धबधबा, महादेव गड पॉइंट, कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, नांगरतास धबधबा, बाबा धबधबा येथे हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घाटमार्गासह सर्वच पर्यटनस्थळांवरील रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र होते.
शुक्रवार (ता.३१) पासूनच आंबोलीत हजारो पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झालेली होती. तर शनिवारी आंबोली परिसरातील सर्वच हॉटेल्स आगावू बुकिंगने हाऊसफुल्ल झाल्याचेचित्र होते. आंबोलीत रविवारी सकाळ पासूनच असंख्य पर्यटकांच्या गर्दीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. घाटमार्गासह आंबोली बाजारपेठे व अंतर्गत रस्त्यांवर वाहानांच्या रांगा दिसून येत होत्या. घाटमार्गातील वाहतूक संथ गतीने सुरू होती. याचा फटका आंबोली मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बसला.
वीकेंड निमित्त शुक्रवार, शनिवार व रविवार अश्या तीन दिवसात लाखांहून अधिक पर्यटकांनी आंबोलीला भेट दिली. मुख्य धबधबा, महादेव गड पॉइंट, कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, नांगरतास धबधबा, बाबा धबधबा येथे पर्यटकांकांची मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पर्यटकांनी आंबोली फुलून गेल्याचे चित्र होते.