leopard vs monitor lizard fight : कास गावात बिबट्या व साळिंदराच्या लढाईचा थरार!

हल्ल्यात साळिंदर जखमी झाला असून जवळपास एक तास बिबट्या आणि साळिंदर यांच्यात झटापट
leopard vs monitor lizard fight
कास : रात्रीच्या वेळी सावजाच्या शोधात असलेला बिबट्या.pudhari photo
Published on
Updated on

मडुरा : कास गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण असून, कास वाघबिळकर मंदिराजवळ बिबट्याने साळिंदरावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात साळिंदर जखमी झाला असून जवळपास एक तास बिबट्या आणि साळिंदर यांच्यात झटापट सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री सुमारे 10 वा.च्या सुमारास संदेश भाईप, यश भाईप, योगेश भाईप व सुभाष भाईप हे बांदा येथून कास येथे घरी परतत असताना त्यांना ही झटापट दिसून आली. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर ग्रामस्थांनी जाब विचारल्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुतळी बॉम्ब फोडून बिबट्याला पळवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

leopard vs monitor lizard fight
Mahayuti unity Malvan : मालवणात महायुतीतील वाद शमला!

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून कास गावात बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वी सुभाष भाईप यांच्या घराजवळून बिबट्याने बोकड पळवून नेला होता. मात्र पुरावा नसल्याचे कारण देत वनविभागाने पंचनामा केला नव्हता, त्यामुळे भाईप यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.आता वनविभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

leopard vs monitor lizard fight
Rashtrakuta capital Elichpur : राष्ट्रकूट राजधानी एलिचपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news