Young Man Died In Sleep | तळेरे बसस्थानकात झोपेतच तरूणाचा मृत्यू

Vaibhavwadi Incident | वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील विजय बबन कोकरे (29) याचा झोपेतच मृत्यू झाला.
Young Man Died In Sleep
तळेरे बसस्थानकात झोपेतच तरूणाचा मृत्यू File Photo
Published on
Updated on

कणकवली : तळेरेत बसस्थानकामध्ये बुधवारी सायंकाळी 6 ते गुरूवारी सकाळी 5 वा. या कालावधीमध्ये झोपून असलेल्या वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील विजय बबन कोकरे (29) याचा झोपेतच मृत्यू झाला.

याची खबर तळेरे बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रभाकर राजाराम कामत यांनी कणकवली पोलिसात दिली. तळेरे बसस्थानकात वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेल्या प्रभाकर कामत यांना बुधवारी सायंकाळी 6 वा. च्या सूमारास एक तरूण झोपलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच्या तोंडावर पाणी मारून उठविण्याचा प्रयत्न केला असता तो दारूच्या नशेत होता.

Young Man Died In Sleep
Kankavali ST Bus Issue | एस.टी. बसमधील सीटवर पाणी

त्याने मी इथेच झोपणार असून नंतर घरी जाणार असल्याचे कामत यांना सांगितले. त्यानंतर प्रभाकर कामत हे ड्युटी संपवून आपल्या घरी गेले. गुरूवारी पहाटे 5 वाजता प्रभाकर कामत हे तळेरे बसस्थानकात ड्युटीवर हजर झाले असता त्यांना तो तरूण तेथेच झोपलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. नंतर खाजगी डॉक्टरांना बोलवून घेत त्याची तपासणी केली असता तो मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news