सिंधुदुर्ग : नराधम पती सुशांत गोवेकर रात्रीच ताब्यात

दुर्दैवी प्रीती केळूसकरचा उपचारादरम्यान मृत्यू
Sindhudurg crime news
पत्नीला खूनाप्रकरणी पतीला अटक
Published on
Updated on

मालवण : पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न झालेल्या सौभाग्यश्वरी सुशांत गोवेकर उर्फ प्रीती केळूसकर (35) या महिलेचा अखेर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. तिला पेटवून देत फरारी झालेल्या पती संशयित सुशांत सहदेव गोवेकर याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व मालवण पोलिसांच्या पथकाने रात्री कुंभारमाठ येथून ताब्यात घेतले. 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

Sindhudurg crime news
सिंधुदुर्ग : घराच्या वापरावरून वेंगुर्लेत दोन कुटुंबांत हाणामारी

सौभाग्यश्वरी सुशांत गोवेकर (35) हिच्या अंगावर तिचा पहिला पती सुशांत सहदेव गोवेकर (40, रा. धुरीवाडा मालवण) याने बुधवारी दुपारी 2.30 वा. शहरातील एसटी स्टॅण्ड समोरील ठिकाणी पेट्रोल ओतून लायटरने पेटवून तिला जिवे ठार मारल्याप्रकरणी प्रीती केळूसकर हिचा भाऊ परेश अभय केळूसकर याने पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सुशांत गोवेकर याच्यावर इछड. 103 (वाढीव) 109.124 (ए). 117 (8), 118 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मालवण बसस्थानकासमोरील के. जी. डायग्नोस्टिक सेंटर या लॅबची लॅब टेक्निशियन असलेल्या सौ. सौभाग्यश्वरी सुशांत गोवेकर (35, माहेरचे नाव प्रीती केळुसकर) हिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी सौ. सौभाग्यश्वरी हिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती नाजूक बनल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. रात्री 9 वा. तिचा मृत्यू झाला. प्रीती हिने ज्या ठिकाणी आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली होती, त्याचठिकाणी तिच्या पतीने तिचा घात केला. आपल्या कार्यालयात मग्न असताना तिच्या अंगावर पेट्रोल ओतून काही समजायच्याच आत लायटरने पेट घेण्यात आला. यात प्रीती 70 टक्के भाजली होती. दरम्यान, सौ. सौभाग्यश्वरी यांना त्यांचा पहिला पती सुशांत गोवेकर (रा. धुरीवाडा, मालवण) याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले होते.

आगीच्या विळख्यातच प्रीती लॅबमधून बाहेर आली

बुधवारी दुपारी प्रीती काम करीत असलेल्या लॅबमध्ये येऊन सुशांत याने बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतून हातातील लायटरने तिला पेटविले. त्यानंतर तो पळून गेला. पेटलेल्या अवस्थेत सौ. सौभाग्यश्वरी त्याच स्थितीत रस्त्यावर धावत येताच परिसरातील नागरिक हादरून गेले होते. त्यांनी धावाधाव करून आग विझविली व त्यांना मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रीती आगीच्या ज्वाला भडकत असताना ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. काहींनी पाणी मारले तर काहींनी आगीत थेट हात घालत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग तिच्या अंगातील कपड्यांनाही लागल्याने कपड्यानींही पेट घेतला होता. तिच्या वेदना आणि तिची वाचण्यासाठी चाललेली धडपड पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.

सुशांतच्या मागावर होती पोलिसांची तीन पथके

सुशांत गोवेकर हा घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर तो कुंभारमाठ परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे पोलिसांनी कणकवली, कुडाळ आणि मालवण याठिकाणी शोधमोहीम राबविण्यासाठी तीन पथके तैनात केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारीही यात सहभागी झाले होते. रात्रभर सुशांत याचा शोध सुरू होता. गुरुवारी सकाळी सुशांत कुंभारमाठ परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

चौकशी पूर्ण झाल्यावर अटक : पोलिस निरीक्षक

पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, संशयित सुशांत याला ताब्यात घेण्यात आलेले असून त्याच्यावर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात त्याला कोणी साथ दिली आहे का? प्रीती हिला ठार मारण्याचा त्याचा उद्देश काय होता? याबरोबर इतरही काही गोष्टींचा तपास करण्यात येणार असल्याचे श्री. कोल्हे यांनी स्पष्ट केले. या चौकशीसाठी पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले, सहायक पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस हवालदार आशिष गंगावणे, पोलिस हवालदार प्रमोद काळसेकर यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे. मालवण पोलिस ठाण्याची सर्व टीम यासाठी तपासात सक्रियपणे कार्यरत आहे, असेही पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले.

Sindhudurg crime news
सिंधुदुर्ग : रेल्वे थांब्याच्या बाबतीत सावंतवाडीवर अन्याय; प्रवासी संघटनेची नाराजी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news