Vengurla Motorcycle Theft Case | वेंगुर्लेत मोटारसायकल चोरणारा संशयित गोव्यात जेरबंद

Vengurla Motorcycle Theft Case |
Vengurla Motorcycle Theft Case | वेंगुर्लेत मोटारसायकल चोरणारा संशयित गोव्यात जेरबंद
Published on: 
Updated on: 

ओरोस : वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यात सापळा रचून ताब्यात घेतले.

धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. गणेशनगर, कोलवले, गोवा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर वेंगुर्ला पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संशयित गुप्ता हा पणजी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पणजी येथे सापळा रचून धीरज गुप्ता याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, डॉमीनिक डिसोझा, हवालदार जॅकसन घोन्सालविस, पोलिस अंमलदार अमर कांडर, महेश्वर समजिस्कर तसेच सायबर विभागाच्या धनश्री परब सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news